पुणदीवाडी

निर्मलग्राम पुणदीवाडी,

ता. पलूस, जि. सांगली.

प्रस्तावना–

पुणदीवाडी, ता. पलूस हे गांव कृष्णानदीच्या तीरापासून अर्धा कि.मी. अंतरावर वसलेले आहे. या ग्रामपंचायतीची स्थापना दि.12/8/1983 रोजी झाली आहे. या गावाचा सांप्रदायीक वारसा असून गावात 2 भजनी मंडळे आहेत. या गावाचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ असून भैरवनाथाचे मंदिर गावाच्या सुरवातीस आहे. हे गाव दोन वर्षापुर्वी अतिशय अस्वच्छ होते. परंतु अधिकारी व पदाधिकारी यांचे प्रभोधनातून या गावाने निर्मलग्राम करणेचा ध्यास घेतला. जे कुटुंब आर्थिक ष्टा कमकुवत आहेत अशा लोकांनी शौचालय बांधण्याच्या जिद्दीने प्रसंगी वेगवेगळया बॅंकांची/पतसंस्थाची कर्जे घेवून शौचालये बांधली आहेत. येथे पशुधन जास्त असलेने जास्तीत जास्त बायोगॅस असून त्यावरती शौचालये बांधलेली आहेत. दि.27/7/2005 रोजी आलेल्या कृष्णेच्या पुरोन पूर्ण गावाला वेढा दिला होता. येथील शेतकयांचे बरेच आर्थिक नुकसान होवून सुध्दा येथील लोकांनी जिद्दीने आपले संसार पुन्हा उभे केले आहेत.

मौजे पुणदीवाडी गावाला पूर्वी खातेवाडी म्हणून संबोधले जात असे. पुणदी तफ‍र्े वाळवा या गावाचा एक वस्ती भाग समजले जात असत. पुणदीतर्फे वाळवा ग्रामपंचायतीला पुणदीवाडी गावातून दोन पंचवार्षिक सरपंच पद भेटले आहे. नंतर कालांतराने 1983 साली पुणदीवाडी गाव म्हणून शासनाने जाहिर केले व गावासाठी वेगळी ग्रामपंचायत स्थापन झाली. पुणदीवाडी गाव हे एक भावकी गाव आहे. गावात इतर कोणत्याही प्रकारचा उदा. महार, मांग, चांभार, गुरव, रामोशी, मुस्लीम समाज नाही एकमेव मराठा समजा गावात आहे. त्यामुळे गाव एकमताने व एक दिलाने चालते. हे आपले आवचे महत्वपूर्ण वैशिष्टये आहे. गावाच्या दक्षिणेकडून 400 ते 500 फुटाच्या अंतरावरुन कृष्णा नदी गेलेली आहे.

पुणदीवाडी हे गाव ऊस शेती व्यवसायासाठी पाच कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील प्रसिध्द मानले जाते. जवळ जवळ 50 टक्के लोक शेतीवर अवलंबून असून 5 टक्के लोक नोकरी व्यवसाच व 50 टक्के लोक मोल मजुरी करुन सुखी जीवन जगतात. नागराळे व पुणदीतर्फे वाळवा या दोन गावाच्या मध्ये वसलेले पुणदीवाडी हे एक छोटेशे गाव आहे. भागातील कुठल्याही गावाला मुंबईहून एस.टी सेवा सुरु नाही. परंतु पुणदीवाडी या छोटयाशा गावाला मुंबई नवीपुणदी एस.टी.बस सेवा सुरु करण्यात आली आहे.