सांस्कृतिक

आर्थिक सांस्कृतिक आणि मनोरंजानात्मक उत्सव–

चैत्र महिना सुरु होण्यापूर्वी जवळ जवळ शेतीची कामे संपत आलेली असतात. त्यामुळे शेतकरी कामातून थोडे निवांत झालेले असतात. त्यावेळी सर्वांना यात्रेचे वेध लागतात. यात्रेचे कार्यक्रम आणि वर्गणीबद्दल गावक–यांची बैठक म्हणजे यात्रेची नांदी असते. यात्रा जवळ आली की लहानापासून मोठयापर्यंतचा उत्साहाला उधाण येते बाहेरगावी नोकरी व्यवसायासाठी गेलेले लोक नातेवाईक या निमित्ताने एकत्र येतात ही यात्रा म्हणजेच गावची दिवाळीच प्रत्यक्ष यात्रेचा दिवस उजाडतो त्यादिवशी सकाळी सर्वजण लवकर अंघोळ करुन गावात जातात यात्रे निमित्त गावात बैलगाडी शर्यती, कुस्त्यांचे मैदान व तमाशाचा किंवा कलापथकाचा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत.

गावकयांच्या जमा झालेल्या वर्गणीतून प्रथमत: मंदिराची रंगरंगोटी करुन मंदिर छान सजवले जाते. यासाठी गावातील सर्व तरुण मंडळी एकत्र येवून काम करतात. नंतर दुपारनंतर श्री. भैरवनाथाची पालखी सजवून बाहेर काढली जाते. ती पालखी वाजत गाजत गुलालाच्या उधळणीने पालखी संपूर्ण गावातून फिरवली जाते. संपूर्ण गाव एकत्र येवून पालखी कार्यक्रमात भाग घेतो. यात्रेच्या पहिल्या दिवशी गोड पोळयांचा नैवैद्य केला जातो. सर्वजण या गोड नैवैद्याचा अस्वाद घेवून यात्रेच्या दुस–या दिवशी तिखट म्हणजे मटणाचा कार्यक्रम घेतला जातो. प्रत्येक घरी मटणाचे जेवण करुन प्रत्येकजण मित्रमंडळी यांना निमंत्रण देवून मटणावर ताव मारतात.

गाव हे संपूर्ण एकभावकी असलेमुळे गावात कलापथक किंवा तमाशाचा कार्यक्रम आयोजित केला जात नाही. यात्रेनिमित्त कोणताही पोलीस बंदोबस्त मागविला जात नाही. यात्रेनिमित्त कोणत्याही प्रकारचा दंगा होत नसल्याने गावाचे नाव पंचक्रोशित काढले जाते. अशाप्रकारे गावातील यात्रेचा कार्यक्रम शांततेत पार पडतो.

नंतर दोन दिवसामध्ये विश्रांती ठेवून ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम, स्त्रीभृणहत्या, अंधश्रध्दा निमु‍र्लन इत्यादीवर प्रबोधनपर कलापथकाचा कार्यक्रम ठेवला जातो हे गावचे यात्रेचे वैशिष्टये आहे.

गणेशोत्सव हा सर्वांना आनंदाची पर्वणी देणारा उत्सव गावामध्ये दोन गणपती मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामध्ये भैरवनाथ गणेशमंडळ व शिवशंभो गणेश मंडळ अशा दोन मंडळे येतात. श्री. भैरवनाथ गणेश मंडळाचे श्रींच्या मुर्तीचे विर्सजन सात दिवसांनी केले जाते व शिवशंभोचा गणेश मुर्तीचे विसर्जन नऊ दिवसाने केले जाते. श्री. भैरवनाथ गणेशमंडळचा सात दिवसाच्या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. उदा संगीत खुर्ची, भजन, किर्तन, प्रवचन, व्याख्यान सहाव्या दिवशी गणेशाची पूजा मांडली जाते व सातव्या दिवशी संध्याकाळी 10 वाजेच्या आत वाजत गाजत गुलालाची उधळण करीत श्रीं च्या मुर्तीचे विर्सजन केले जाते. त्याचदिवशी मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला असतो. त्यामुळे सर्व गाव एकत्र येवून या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेते तसेच शिवशंभो गणेशमंडळही नऊ दिवसामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. त्यांचाही महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम असतो व नवव्या दिवशी वाजत गाजत श्रींच्या मुर्तीचे विसर्जन कृष्णा नदीत केले जाते. गावामध्ये श्री. भैरवनाथ मंदिरात सात दिवसाचा हरिभक्त पारायण सप्ताह भरविला जातो.

दत्तजयंती, बैलपोळा बेंदूर, शिवजयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महाशिवरात्री हे सर्वच जाती धर्माचे सन उत्सव मोठया उत्साहात साजरे केले जातात या सर्व कार्यक्रमात गावकरी उत्साहाने सहभागी होतात.

15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे राष्ट्रीय सणही मोठया उत्साहाने साजरे केले जातात या राष्ट्रीय सणांना शाळेतील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम विविध कसरतीचे प्रयोग करत असतात.