पुरस्कार

पुणदीवाडी गावाला 1989 साली बचत ग्रामचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच 2006 साली निर्मलग्रामचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त अभियान अंतर्गत नागरिकांची आप–आपसातील भांडणे समझोत्याने मिटवण्यात येतात त्यामुळे पोलीस स्टेशनकडे जाणा–या नागरिकांची संख्या काही नाही तसेच गावात एकही महसुली, फौजदारी व दिवाणी तंटा एकही नाही गावाला 2007 साली महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या माध्यमातून 1 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर झाले आहे. त्यातून गावांतर्गत विकास कामे करण्याचे नियोजन आहे.