पायाभूत सुविधा

  1. गावातील मुख्य रस्ता ग्राम पंचायत ऑफीस पर्यंत ज्या रस्त्याने पावसाळयात नागरिकांना नीट चालता येत नव्हते त्याठिकाणी नविन डांबरीकरण रस्त्याचे काम अगदी मजबूत करुन घेतले.
  2. ग्रामपंचायत समोरील संपूर्ण पटांगण डांबरीकरण करुन घेतले.
  3. गावामधील अन्य रस्त्यांची कामे चालू आहेत.
  4. त्याबरोबर रस्त्यावर विजेच्या दिव्यांची सोय केली आहे.
  5. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय कुंडल प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना कुंडल माफ‍र्त केली जाते.
  6. गावात एस.टी, खाजगी जीप या दळणवळणाच्या सोयी आहेत.
  7. पुणदीवाडी गावाला मुंबई (परळ) ते नविपुणदी अशी एस.टी. सेवा सुरु आहे.
  8. त्याचप्रमाणे मिरज डेपोची एक बस सांय 6.00 वा. गावात येते व रात्री मुक्कामी थांबुन सकाळी 6.30 वा. गावात सुटते.
  9. गावामध्ये मोठया प्रमाणात दुरध्वनीची घरोघरी सेवा उपलब्ध आहे.
  10. तसेच 15 लाखाच्या कृष्णा नदीकाठावर पुरसंरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले आहे.