गावातील नागरिकांना आठवडयाचा बाजार करणेसाठी गावापासून 6 कि.मी. अंतरावर असणारे किर्लोस्करवाडी येथे जावे लागते.
पुणदीवाडी, ता. पलूस हे गांव कृष्णानदीच्या तीरापासून अर्धा कि.मी. अंतरावर वसलेले आहे. या ग्रामपंचायतीची स्थापना दि.12/8/1983 रोजी झाली आहे. या गावाचा सांप्रदायीक वारसा असून गावात 2 भजनी मंडळे आहेत. या गावाचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ असून भैरवनाथाचे मंदिर गावाच्या सुरवातीस आहे. हे गाव दोन वर्षापुर्वी अतिशय अस्वच्छ होते. परंतु अधिकारी व पदाधिकारी यांचे प्रभोधनातून या गावाने निर्मलग्राम करणेचा ध्यास घेतला. जे कुटुंब आर्थिक ष्टा कमकुवत आहेत अशा लोकांनी शौचालय बांधण्याच्या जिद्दीने प्रसंगी वेगवेगळया बॅंकांची/पतसंस्थाची कर्जे घेवून शौचालये बांधली आहेत. येथे पशुधन जास्त असलेने जास्तीत जास्त बायोगॅस असून त्यावरती शौचालये बांधलेली आहेत. दि.27/7/2005 रोजी आलेल्या कृष्णेच्या पुरोन पूर्ण गावाला वेढा दिला होता. येथील शेतकयांचे बरेच आर्थिक नुकसान होवून सुध्दा येथील लोकांनी जिद्दीने आपले संसार पुन्हा उभे केले आहेत.