पायाभूत सुविधा
- गावातील मुख्य रस्ता ग्राम पंचायत ऑफीस पर्यंत ज्या रस्त्याने पावसाळयात नागरिकांना नीट चालता येत नव्हते त्याठिकाणी नविन डांबरीकरण रस्त्याचे काम अगदी मजबूत करुन घेतले.
- ग्रामपंचायत समोरील संपूर्ण पटांगण डांबरीकरण करुन घेतले.
- गावामधील अन्य रस्त्यांची कामे चालू आहेत.
- त्याबरोबर रस्त्यावर विजेच्या दिव्यांची सोय केली आहे.
- नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय कुंडल प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना कुंडल माफर्त केली जाते.
- गावात एस.टी, खाजगी जीप या दळणवळणाच्या सोयी आहेत.
- पुणदीवाडी गावाला मुंबई (परळ) ते नविपुणदी अशी एस.टी. सेवा सुरु आहे.
- त्याचप्रमाणे मिरज डेपोची एक बस सांय 6.00 वा. गावात येते व रात्री मुक्कामी थांबुन सकाळी 6.30 वा. गावात सुटते.
- गावामध्ये मोठया प्रमाणात दुरध्वनीची घरोघरी सेवा उपलब्ध आहे.
- तसेच 15 लाखाच्या कृष्णा नदीकाठावर पुरसंरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले आहे.




